उंबरठा ओलांडला नाहीस तरी तुला कळतंय मला काय म्हणायचं आहे ते ...
हे मान्य करण्यात कोणताच उंबरठा आड येण्याचं काही कारण नाही .
पण उत्तराचा उंबरठा ओलांडावा लागू नाही म्हणून विषय बदलशील ...
हळूच म्हणशील ..." यांत थोडी हे नेमकं कोणाचं विशेषण ? पानांचं की ओलेपणाच ?
मग मी ही उंबरठा न ओलांडता सांगू शकेन ...दोन्हीचे .
ते काय तुझ्या पथ्थ्यावरच पडेल ...
समजावण्याचा स्वर कसा आसमंत व्यापेल ना ...
अशा स्वराला उंबरठ्याच बंधन नसतं ना ! ....आता आयुष्यच एका उंबरठ्यावर उभं आहे ग ...नको करूस असा विचार ...बंधन हा उंबरठा नाही ...घर आहे . त्याचा वासा आणि आढ...आयुष्याचं ...