फेसबुकने बुधवारी वार्षिक निकाल जाहीर केले. ज्यात फेसबुकला २०१७ च्या तुलनेत ५.१ अब्ज डॉलरचा नफा झाला. महसुलातदेखील ४२ टक्क्यांची वाढ झाली असून, १३.२ अब्ज डॉलरचा महसूल मिळाला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मात्र, खर्चात झालेली वाढ चिंताजनक असून पुढील सहा महिने कठीण असल्याचा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे.
फेसबुकच्या सक्रीय सदस्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. ज्यामुळे कंपनीच्या व्यवसायावर परिणाम होण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. या वृत्तानंतर गुंतवणूकदारांनी जोरदार विक्रीचा सपाटा लावला आहे.