रक्ताचं नातं नसतांना
का लळा लावतो
आपण एखाद्याला ?
एखादं झाड रुजावं
पसरावं वटवृक्षाप्रमाणं
अगदी पाळंमुळं
शिरावित एखाद्या
घराच्या पायापर्यन्त
तसच अगदी
मग त्या घरासाठी
झिजत रहावं
पानगळ होईपावेतो
उन्हाळा हिवाळा व
पावसाळ्यातही देत
संरक्षण मायेच्या
ओलाव्यासह.
एक दिवस त्याच
घरातील माणसं
कु-हाड चालवतील
बांधकामात अडथळा
येतोय म्हणून.
हे माहित असूनही
जीव का तुटतोय
हा प्रश्न अनुत्तरीतच .