मनापासून सांगत आहे अशी प्रस्तावना असल्यामुळे जरा जास्तच कुतूहल
" काही नाही . तू फ़ेसबुक , whatsapp चा वापर ज्या पद्धतीने करतोस त्याच कौतुक वाटतं . पण पुन्हा ब्लॉग किंवा ट्विटर वापरताना तू नाही आढळत ."
" ब्लॉग आणि ट्विटर नाही वापरत खरं . ते शिकायचं आहे . पण नाही जमलं अजून ते ."
" फ़ेसबुक आणि whatsapp सुद्धा तू वेगवेगळ्या क्षेत्रातील पोस्ट करता उपयोगात आणतोस ."
" ते काही ठरवून केलेले नाही . पण झालंय खरं तसं "
" त्यात काही वावगं नाही . पण तू ते मनःपूत लेखन करण्यासाठी आणि तेही सातत्यानं अंमलात आणतोस .आणि म्हणूनच कमाल आहेस असं म्हणलं "
" तुला आत्ताच म्हणलं तसं ते काही ठरवून करत नाही . मला बोलायला , संवाद साधायला , संभाषणात राहायला खूप आवडतं हे तर तुला माहीत आहेच ."